महाराष्ट्रमुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईच्या वतीने जोडे मारो आंदोलन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथील चवदार तळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा,मुंबईच्या वतीने जोडे मारो आदोलन

मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाड येथील चवदार तळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा,मुंबईच्या वतीने जोडे मारो आदोलन करण्यात आले. यापूर्वीही देखील जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्री रामचंद्रजींचा अपमान केला होता. जितेन्द्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, मंत्रालया समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “शरद पवार गटनेते जीतुद्दीन आव्हाड हे मनोरुग्ण आहेत. जो नेहमीच चुकीची विधाने करून भारतीय संस्कृती आणि समाजाशी निगडित लोकांचा अपमान करत असतो.असा माणूस बाहेर राहिला तर तो कुठल्यातरी महापुरुषाचा अपमान करेल. त्याची खरी जागा तुरुंगात आहे.

 

याआधीही निळा झेंडा फेकून दिला होता. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले आराध्य प्रभू श्री रामजी यांचा अपमान करण्यात आला होता आणि आता स्टंटबाजी करत महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून देशाचा आणि बाबासाहेबांवर आस्था असणाऱ्या दलित समाजाचा अपमान केला आहे. एकदा केलेली चूक, पुन्हा-पुन्हा पुनरावृत्ती झाली तर ती चूक नाही, तो गुन्हा आहे आणि गुन्ह्याला क्षमा नाही, शिक्षा आहे. ”

जितेंद्र आव्हाड सारख्या मनोरुग्णावर गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने जोरदार जोडा मारो आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button