उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का? मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांचा सवाल
पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
मुंबई: पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा सवाल अँड. शेलार यांनी केला.
मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवसापासून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी गजधरबांध परिसरातील नाल्याची पाहणी केली.तर काल पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड (पश्चिम ), अवधूत नगर नाला दहिसर (पूर्व ) एन.एल कॉम्प्लेक्स जवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करतोय. जी आकडेवारी पालिका सांगतेय आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. 95 % सफाईचा दावा वडनई नाल्याचा केला जातोय, पण प्रत्यक्षात अद्याप गाळ नाल्यातून काढण्यात येतो आहे.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली त्याचे स्वागत करीत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, शिंदे हे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांची काळजी केली. यापुर्वी उध्दव ठाकरे यांच्या रूपाने बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिले. ते घरी बसून नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत होते.
मर्दांचा पक्ष म्हणून वारंवार सांगणारे उध्दव ठाकरे कुठे आहेत? इथे नाल्यावर मर्दूमकी का दाखवत नाहीत, ते लंडनच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत का? असा खोचक सवालही आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे स्थानिक आमदार, नगरसेवक, उत्तर मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, भाजपा पदाधिकारी आणि पालिका अधिकारी सहभागी झाले होते.
.