बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशींना 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बोरीवली पोलीस ठाणेचे अधिकारी यांना 19 अक्तूबर 23 रोजी मिळालेल्या माहीतीनुसार बोरीवली पोलीस ठाणे हद्दीमध्ये 3 अवैध घुसखोर बांग्लादेशी नागरीक मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन बोरीवली पोलीस ठाणे गुरक्र 630/2023 कलम
मुंबई: बोरीवली पोलीस ठाणेचे अधिकारी यांना 19 अक्तूबर 23 रोजी मिळालेल्या माहीतीनुसार बोरीवली पोलीस ठाणे हद्दीमध्ये 3 अवैध घुसखोर बांग्लादेशी नागरीक मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन बोरीवली पोलीस ठाणे गुरक्र 630/2023 कलम 420,465,467,468,470,471 भादंविसं सह नियम 3 सह 6 पारपत्र ( भारतात प्रवेश ) 1950 सह परिच्छेद 3 (1) (अ) परकिय नागरीक आदेश 1948 सह कलम 14 परकीय नागरीक कायदा 1946 भादंविसं अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता. राजीव जैन अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, आनंद भोईटे पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-11), सुनिल जायभाये सहायक पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरीवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांचे देखरेखीखाली तपास अधिकारी पोनि काळे ,सपोनि साळुंके , पोउपनि प्रमोद निंबाळकर , पोउपनि कल्याण पाटील व पोलीस पथक पोहवा 26899/शेख , पोहवा राणे , पोहवा सावर्डेकर पोशिक्र /080080 केसरे , पोशिक्र 110254/ रेवाळे , पोशिक्र 130276/ गर्जे या पोलीस पथकाने नमुद आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करुन नालासोपारा , विरार , पुणे येथुन आणखी 17 बांग्लादेशी नागरीकांना ताब्यात घेवुन अटक करणेत आली. नमुद आरोपींनी भारतातील वास्तव्यादरम्यान भारतीय , पासपोर्ट , व्हीसा ,जन्म प्रामाणपत्र , आधारकार्ड , पॅनकर्ड , मतदानकार्ड इत्यादी बनावट भारतीय कागदपत्रे तयार केलेली होती. त्यानुसार बांग्लादेशातून अवैधमार्गाने भारतात आणुन बनावट भारतीय कागदपत्रे व भारतीय पासपोर्ट, व्हीसाव्दारे मध्य पूर्वेतील देशामध्ये पाठविणाऱ्या बांग्लादेशी रॅकेट उघड करुन पुणे येथुन बनावट कागदपत्रे व पासपोर्ट बनवुन देणाऱ्या 2 भारतीय एजंट यांना नमुद गुन्ह्यात अटक करणेत आली होती. तपास अधिकारी पोनि काळे यांनी पुणे , पश्चिम बंगाल या ठीकाणी जावुन पुरावे गोळा करुन नमुद आरोपीतांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले . पो.हवा 03589/जाधव, पोहवा 041031/कणसे यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली. नमुद गुन्ह्याची सुनावणी 8 वे न्यायालय, किल्ला कोर्ट, आझाद मैदान,मुंबई या ठिकाणी पार पडली . सुनावणी अंती 24 मे रोजी 8 वे न्यायालय, किल्ला कोर्ट यांनी नमुद गुन्ह्यतील 20 अवैध घुसखोर बांग्लादेशी नागरीकांनी 8 महीने कारावास व 4000 रुपये दंड व दंड न भरलेस आणखी 16 दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा लागलेल्या आरोपीतांची नावे – 1)सुमन मोमीन सरदारउर्फ विष्वजित बाटुल मंडल, 31 वर्षे, पत्ता-गांवईश्वरीपुर, शामनगर, तालुका सतखिरा, जिल्हा खुलना, बांगलादेश 2)ओमर फारुख मोल्लाउर्फ नासिर षाहजहान उदिदन,27 वर्षे, पत्ता-रामचंद्रपुर, पोस्ट होलीधानी, जिल्हा झिनेदा, बांगलादेश 3)सलमान अयुब खानउर्फ अब्दुलसलाम आयुब मोडल, वय 34 वर्षे, पत्ता-दुर्गाभाटी, पोस्टभामीया, पुराकटला, जिल्हासतखिरा, बांगलादेश 4) अतिकुल अकिलुद्दीन मुल्ला,23 वर्षे, पत्ता-झिनेदासेंटर, पोस्ट झिनेदा,तालुका खुलना, जिल्हा झिनेदा, बांगलादेश, 5)सैदुल सफरअली गामन,27 वर्षे,पत्ता-गांव लष्कर, मादबरकंदी, जिल्हाढाका, बांगलादेश, 6)मुस्ताकअली कुतुबुद्दीन तरबदार,22 वर्षे, पत्ता-गांवऔसिया, पो. शोलकुपा, झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 7)फिरोज उलहक मोल्ला,21 वर्षे, पत्ता-गांव रामचंद्रपुर, पोस्टहोलीधानी, जिल्हा झिनेदा, बांगलादेश, 8)रहिम मोईद्दीन मंडल उर्फ रहिमुद्दीन मुल्ला,32 वर्षे, पत्ता-गांवसुजापुर,नराईलविभाग, खुलना, बांगलादेश 9)रॉनी शफीकुल शेख उर्फ रशीद उलइस्माम मोनीर होलादार,22वर्षे, पत्ता-गांव खालीफपुर, जिल्हा खुलना, बांगलादेश, 10)इनामुल कमल सरदार,22 वर्षे,पत्ता-गांव अटरामल, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 11)मसुद राणा इद्रीस गाझी,22 वर्षे,पत्ता-गांव रासनागोर, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना,बांगलादेश, 12)रिपोन रोमेन ढाली,34 वर्षे, पत्ता-गांव पतला खुला, सातखिरा, जिल्हा खुलना, बांगलादेश 13)मोनीरुल मोहमद मुल्ला,25 वर्षे, पत्ता-गांव लिंबुतला, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 14)आरीफ शौकत विश्वास,25 वर्षे, पत्ता-गांव कनीसपुर, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 15)मसुम बिल्ला अश्रफ मंडल,25 वर्षे, पत्ता-राजनगर, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 16)दिलावर इद्रीस गाझी,23 वर्षे, पत्ता-गांव लिंबुतला, पोस्ट झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश, 17)रब्बी कजल मंडल,25 वर्षे, पत्ता-गांव भगवानपुर, पोस्टनारायणपुर, चैगासा, जशोर, बांगलादेश. 18) मुबीन जावेद मंडल उर्फ मुबीन सोईदुल इस्लाम,26 वर्शे पत्ता- लेन नं. 6,बोराटे वस्ती, चंदननगर, पुणे, मुळ गावसवर, पोस्ट सवर, पोलीस ठाणे सवर, जिल्हा व विभाग ढाका, बांगलादेश 19) सुजौन षोरीफउल षेख, वय 26 वर्शे पत्ता-लेन नं.12, यमुना नगर, सम्राट चैक, मुलान नगर, पुणे. मुळगाव गेणुखाली, पोठाणे जिगूरगा, जैसेर, खुलना,बांगलादेश. 20) मिठु शोफीकुल शेख, वय 28 वर्शे रुम नं.6,लक्ष्मीकृपा, गौरव हॉटेलच्या बाजुला, इंडीयन पेट्रोल पंपजवळ, मांगडेवाडी, कात्रज, पुणे. मुळगाव पोस्ट रत्नापुर, कालगंज,सातखिरा, खुलना, बांगलादेश