80 लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह नायजेरियनला अटक
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने नायजेरियन नागरिकाला 80 लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली आहे.
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने नायजेरियन नागरिकाला 80 लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली आहे.
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटचे पोलीस अधिकारी नागपाडा परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना एक परदेशी नागरिक संशयास्पद स्थितीत दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडून 80 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम कोकेन सापडले. पोलिसांनी आरोपी क्रिस्टोफर अबासिरिम याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने क्रिस्टोफरला २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त श्री शाम घुगे (अँटी नार्कोटिक्स सेल, मुंबई) यांच्या सूचनेनुसार वरळी एंटी नार्कोटिक्स सेलचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे