पत्रकाराच्या हत्येप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तचा नातेवाईकाला अटक
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हसन गफूर यांचा जवळचा नातेवाईक नसीर जमाल याने उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हसन गफूर यांचा जवळचा नातेवाईक नसीर जमाल याने उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज पोलीस ठाण्यांतर्गत सबरहद गावात फारुकिया मदरसा द्वारे तलाव ताब्यात घेण्यात आला होता. मदरशातील लोक तलावात अवैधरीते मत्स्यपालन व्यवसाय करत होते.
स्थानिक सुदर्शन न्यूजचे पत्रकार आशुतोष श्रीवास्तव यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. याचा राग येऊन मदरसा कमिटीच्या लोकांनी १३ मे रोजी आशुतोषची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आशुतोषचा भाऊ संतोष श्रीवास्तव याच्या तक्रारीवरून एफआयआर क्रमांक 0169/24 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नासिर फरीदुलहक जमाल, अरफी उर्फ कामरान, जमीरुद्दीन, मोहम्मद हसिम आणि एका अज्ञात आरोपींसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींपैकी मुख्य आरोपी नासिर जमाल हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हसन गफूरचा जवळचा नातेवाईक
असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.