महाराष्ट्रमुंबई
पावसाळी हंगामात जलयानांना समुद्रात जाण्यापासून प्रतिबंध
पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते.
मुंबई: पावसाळी हंगामात सुरक्षिततता आणि पर्यावरणाच्या कारणास्तव समुद्रात जलयाने घेऊन जाण्यास बंदी घातली जाते. त्यामुळे आंतरदेशीय जलयाने कायदा 1917 (इनलँड व्हेसल कायदा 1917) च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या जलयानांनी 26 मे 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या पावसाळी हंगामात जलयाने घेऊन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबईच्या महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ.प्रवीण एस.खरा यांनी केले आहे.