घाटकोपर होर्डिंग घटनेचा मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक
घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने उदयपूर येथून अटक केली आहे.
आर्य न्यूज/मुंबई
घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई गुन्हे शाखेने उदयपूर येथून अटक केली आहे.
13 मे रोजी घाटकोपर पूर्व येथे अवैध होर्डिंग पडले होते. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघातानंतर या होर्डिंगचा मालक भावेश भिडे कुटुंबासह पळून गेला होता. आज मुंबई क्राईम ब्रँचने भावेशला उदयपूर, राजस्थान येथून अटक केली आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पुर्ण झालं आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. आज हे बचावकार्य पुर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सर आणि श्वान पथक, NDRFच्या मदतीने होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का याचा शोध घेतला जात आहे.
मुंबईतील अनाधिकृत होर्डिंग बाबतीत कारवाया हाती घेतल्या आहेत. होर्डिंगसाठी ठरवलेली मानके पाळली पाहिजेत. त्यांची पायाभरणी, हवा जाण्याची सोय ही सर्व मानके ठरवून दिलेली आहे. ती पाळली गेली पाहिजेत. रेल्वेला देखील त्याप्रमाणे आदेश दिले आहेत या मानकांचे पालन झाले पाहिजे. होर्डिंग लावताना परवानगी घेणे आवश्क आहे. सर्व नियम पाळले गेले पाहिजेत, असंही मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे.