पंतप्रधानांकडून संसदीय लोकशाही संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत आहे. यामुळे त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत
पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत आहे. यामुळे त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोदींवर केला आहे.
शरद पवार साहेब म्हणाले की, आज या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्ली व झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे. ज्या व्यक्तीचा, धोरणाचा, पक्षाचा, विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झाला असेल असे शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, मोदींनी मुस्लिम समाजाचा वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, इथे हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेऊन ऑपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. त्यातील एका किंवा दोन् समाजासंबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील. आणि मोदींची अलीकडची काही भाषणं ही समाजा-समाजात गैरविश्वास व्हायला पोषक आहेत, आणि हे देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही, तिथे मी किंवा माझे सहकारी असणार नाहीत. असे शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, आमच्या बुद्धीला जे पटेल, ज्या विचारधारेत आम्ही वाढलो, जी विचारधारा घेऊन आम्ही पुढे जातो, त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही. निवडणुकीच्या ३-४ टप्प्यांमध्ये मोदींच्या विरोधात जनमत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, असं चित्र आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता अशा विधानं ही सांगतात, किंवा संभ्रम तयार करण्याची भूमिका सांगतात. असेही शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, SC, ST यांचं आरक्षण वाढवायचं असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. अवश्य वाढवा. पण, एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करणं, एखाद्या समाजाविषयी राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊन कसं चालेल? प्रधानमंत्री सगळ्यांचे असतात, देशाचे असतात, जे देशाचे नेतृत्व करतात, त्यांनी एका धर्म, जाती व भाषेचा विचार करण्याची सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल, मग ते प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असो. असेही पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणातील निकालाला इतकी वर्ष लागली यामुळेच आम्ही अस्वस्थ होतो. पण त्यांनी काहीतरी निकाल दिला. यामुळे दाभोळकर यांच्या आत्म्याला काहीतरी न्याय मिळाला. मुख्य सूत्रधारासंबंधी न्यायासाठी राज्य सरकारने उच्च वा सर्वोच्च न्यायालयात अपील करावं. असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, राजकारणात बालबुद्धी असं वैशिष्ट्य ज्यांचं आहे, असे अनेक लोक असतात. ते बालबुद्धीने काही बोलत असतात, त्याकडे आपण काय लक्ष द्यायचं? मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते, त्यांच्यावर काही पथ्य पाळण्याची अपेक्षा असते. ते जर दमदाटीची भाषा करत असतील तर संधी मिळेल तेव्हा लोकच त्यांचा विचार करतील. एखाद्या पक्षाबद्दल नकली किंवा असली म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? प्रधानमंत्र्यांनी काही गोष्टींचं तारतम्य बाळगायला हवं. नकली वा असली म्हणणं अयोग्य आणि अशोभनीय आहे. असेही शरद पवार साहेब यांनी सांगितले.
शरद पवार साहेब म्हणाले की, गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही असेही शरद पवार साहेब म्हणाले.