महाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीन केलं पोलीस कोठडीत आत्महत्या

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने मुंबई पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या केली आहे.

श्रीश उपाध्याय/मुंबई: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने मुंबई पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्या केली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चार आरोपीं अनुज थापन, सोनू सुभाषचंद्र, विकास गुप्ता आणि सागर पाल यांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपींना 8 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलिस कोठडीत
अनुज थापनने बुधवारी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ जवळच्या जीटी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
14 एप्रिल रोजी हल्लेखोरांनी सलमान खानच्या घरावर 4 राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी विकास गुप्ता आणि सागर पाल या दोन्ही शूटर्सना गुजरातमधून अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी अनुज थापन आणि सोनू सुभाषचंद्र यांना 25 एप्रिल रोजी पंजाबमधून अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button