सायबर हेल्पलाइन 1930 मुळे नागरिकांचे 1 कोटी रुपये वाचले
पोलिसांना दोन नागरिकांकडून १.८० कोटी आणि २.२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती
श्रीश उपाध्याय/मुंबई
सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 मुळे मुंबईतील सायबर गुन्ह्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवता आले.
ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने काही नागरिकांना अडकवण्यात आले. या प्रकरणाची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला हेल्पलाइन क्रमांक 1930 द्वारे प्राप्त झाली. तक्रार प्राप्त होताच सायबर गुन्हे शाखेने कार्रवाई करत संबंधित बँक खात्यात जमा केलेली रक्कम गोठवली. पोलिसांना दोन नागरिकांकडून १.८० कोटी आणि २.२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यापैकी 1.02 कोटी रुपये 24 तासांत जप्त करण्यात आले असून उर्वरित रक्कमही पोलीस परत मिळवत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,
अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना व पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार सायबर सेल (पश्चिम) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चौहानच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.