महाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक ………..महेश तपासे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या संदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडणार आहेत. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत तसेच पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, श्री पीसी चाको, श्री अनिल देशमुख, श्री जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उभे करण्यात येणाऱ्या उमेदवारांबाबत चर्चा, निर्णय व निवडणूक संदर्भात इतर समित्यांचे गठन होणार अशी माहिती महेश तपासे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button