महाराष्ट्रमुंबई

पालिका आयुक्त बंगल्याच्या कराची थकबाकी 4.56 लाख

महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलक विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पण पालिका आयुक्त बंगल्याची मागील 14 वर्षाची कर थकबाकी 4.56 लाख आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर वीज सुविधांसाठी केलेला खर्चाबाबत मागील 5 वर्षांची माहिती देताना महिन्यावाईज एकूण वीज आकार खर्च, वापरलेले युनिट याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला.अनिल गलगली यांस 5 जून 2024 पर्यंतची माहिती दिली.1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2023 पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. तसेच 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतके आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलमापक विरहित जलजोडणी आहे.

अनिल गलगली यांच्या मते जलमापक लावणे आवश्यक आहे. आयुक्त असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकांनी वेळेवर कर अदा करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button