Mumbai: मुंबई क्राईम ब्रँच, प्रॉपर्टी सेलने आंतरराज्य चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला
मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने चोरांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करून 53 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
Mumbai: महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात चोरांची टोळी मोठी चोरी करणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून 7 आरोपींना अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीचा लीडर शकीर उर्फ गुड्डू हैदर शेख हा इतर आरोपींना चोरीमध्ये वाटा देऊन चोरी करायचा. गुड्डू विमानाने वेगवेगळ्या राज्यात जायचा आणि बंद घरांची रेकी करत असे आणि नंतर सगळ्यांना सोबत घेऊन चोऱ्या करत असे. या टोळीने मुंबईत 18, भुसावळ, जालन्यात 3, निजामाबादमध्ये 13, तेलंगणात 7, अहमदाबादमध्ये 4 आणि पश्चिम बंगालमध्ये 7 चोरी केल्या होत्या.
पोलिसांनी या टोळीला पकडून दीड कोटींहून अधिक रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.सह पोलिस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.