महाराष्ट्रमुंबई

मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणार एकमेव धनकुबेर मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा

श्री गौमतेश्वरी अंबाधाम आश्रम येथे धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे पहिले प्रभु श्री. धनकुबेर यांची मूर्ती तसेच माता चामुंडा देवी, माता महाकाली, मामुंबई ता सरस्वती, श्री. खाटूराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा साधु, संत, मान्यवर यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. दि. 11 मार्च ते 13 मार्च 2024 रोजी असे तीन दिवस भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे.

पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातून पहिल्यांदाच धन कुबेर यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने मूर्ती प्राणप्रतिष्ठा साठी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री. अंबामाता, महादेव, श्रीकृष्ण, राममंदिर, श्री विठ्ठल, श्री.परशुराम, श्री.लक्ष्मी नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी, यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री. धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दि. 11 व 12 मार्च 2024 मुर्ती पुजन भजन उत्सव आयोजित करण्यात आला असून आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, हवालदार दुबे, ओमप्रकाश शर्मा (अध्यक्ष परशुराम सेना), प्रतीक (गुड्डू) राय, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी यांच्याकडे नियोजन असणार आहे. दि. 13 मार्च 2024 रोजी प्राण प्रतिष्ठा दुपारी 12 वाजेनंतर मुर्ती अभिषेक करता येणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button