महाराष्ट्रमुंबई

युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध युवकांची वज्रमूठ

बेरोजगारीस कारणीभूत असलेल्या या मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

बेरोजगारीस कारणीभूत असलेल्या या मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या युवक आघाड्यांनी रणशिंग फुंकण्याचे ठरविले आहे. त्याअनुषंगाने उद्या (दि. 6) मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

देशातील युवकांना वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ,असे आश्वासन देत नरेंद्र मोदी हे सत्तेत आले. पण सत्तेत आल्यानंतर दूरदृष्टीचा अभाव असलेल्या मोदींनी कुठलाही सारासार विचार न करता फक्त चमकोगिरीसाठी काही निर्णय घेतले आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला तर आलीच आहे. पण देशातील युवक बेरोजगारीच्या खाईत ढकलला गेला आहे. या बेरोजगारीस कारणीभूत असलेल्या या मोदी सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या युवक आघाड्यांची मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभेचं नियोजन आणि त्यात युवकांना कसं सामावून घ्यायचं यावर चर्चा झाली. बेरोजगारी असो किंवा पेपरफुटीच्या घटनांवर सरकारचं सोयिस्कर मौन अशा युवकांच्या मुद्द्यांवर युवक आघाड्यांनी लक्ष देणं व त्यासंबंधी इंडिया आघाडीतर्फे राज्यभर लोकसभानिहाय मेळावे घेणं जेणेकरून त्या मुद्द्यांना प्रभावीपणे लोकांसमोर आणता येईल असं एकंदरीत ठरलेले आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडी मधील घटक पक्षांचे युवक आघाड्यांना सुद्धा सोबत घेण्याचं ठरविण्यात आले.

येत्या सहा मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटरला युवा महाराष्ट्राभिमान मेळावा होणार आहे आणि त्यात युवा आघाडीची पुढील दिशा व निवडणूकचं नियोजन ठरणार आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत युवासेना सचिव वरूण सरदेसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button