बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार
बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब - मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार
मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने गती पकडली असून आज केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव जी यांनी आज मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ केला. मुंबई, महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटेल अशा या पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रत्यक्ष कामाला आज मंत्री महोदयांनी सुरूवात करुन दिली. हे काम अडीच वर्षापूर्वीच सुरू व्हायला हवं होतं. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने याला विरोध केला, कामाला परवानगी दिली नाही आणि जनतेची अडीच वर्षे फुकट गेली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चवाढीचं पापही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारकडे जातं.
पण आता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर येत असून ब्लास्टद्वारे एकाच वेळी ५६ मीटर खोल, ४० मीटर रुंदी असलेल्या, एकाच वेळी दोन्ही बाजुने खोदकाम होत असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला आज सुरूवात झाली. समुद्राखालूनही प्रकल्पाचं काम पूर्ण होणार आहे. सर्व आवश्यक पर्यावरणीय परवानग्या घेऊन एकाच वेळेस चार ठिकाणी जलगदतीने हे काम सुरू होतेय. अत्यंत वेगवान अशी ही बुलेट ट्रेन मुंबईसह देशाचं आणि सामान्य माणसाचं उद्याच्या विकसीत भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहे. मी मुंबईकरांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो.