महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार साहेब यांच्या समर्थनात निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ निदर्शने
मुंबई दि.७ फेब्रुवारी
राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार साहेब यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून मुंबईतील प्रदेश पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार अशा घोषणा शरद पवार साहेब यांचे समर्थक कार्यकर्ते आंदोलन दरम्यान देत आहे.
मुंबई विभागातील कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयासमोर अजित पवार यांच्या फोटोला काळं फासत, विरोधात घोषणा देत आंदोलन केले आहे. ‘जो नाही झाला काकाचा, तो काय होणार जनतेचा’, ‘जो नाही झाला बहिणीचा, तो काय होणार जनतेचा’, ‘जो नाही झाला काकींचा, तो काय होणार जनतेचा’ अशा घोषणा अजित पवार यांच्या नावाने देण्यात येत आहे, तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात देखील आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी, राखीताई जाधव मुंबई अध्यक्ष, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, परेश बैदुर अध्यक्ष ग्राहक संरक्षण, अमोल मातेले मुंबई युवक अध्यक्ष, अजय समगीर मुंबई युवक कार्याध्यक्ष, प्रिया बांदवडेकर महिला मुंबई अध्यक्ष, सुरैना मल्होत्रा महिला मुंबई कार्याध्यक्षा, सोहेल सुभेदार अल्पसंख्यांक विभाग मुंबई अध्यक्ष, देवन आचार्य, ॲड प्रशांत दिवटे विद्यार्थी अध्यक्ष, मिलिंद अण्णा कांबळे माजी आमदार, अजित रावराणे जिल्हाध्यक्ष, रुपेश खांडके दक्षिण मुंबई, विजय शिरोडकर उत्तर मुंबई , यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.