श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने गोरेगाव परिसरातून दोन नायजेरियन नागरिकांना १७,४०,००० रुपयांच्या अमली पदार्थांसह अटक केली आहे.
एएनसी, घाटकोपर युनिटचे पोलीस अधिकारी गोरेगाव, आरए कॉलनीजवळ गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना दोन नायजेरियन नागरिक संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडून 87 ग्राम एमडी सापडले. पोलिसांनी कमल सनी आणि मोशेज संडे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दोन्ही आरोपी यापूर्वीही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकले आहेत. जामिनावर सुटल्यानंतर ते पुन्हा अंमली पदार्थांचा व्यवसाय करू लागले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे)लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई एएनसीच्या घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने केली आहे.