मुंबई गुन्हे शाखा 10 ने दोन आरोपींना चार पिस्तुलांसह केली अटक.
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई गुन्हे शाखा 10 ने दोन आरोपींना अटक करून 8 जिवंत काडतुसांसह चार पिस्तुल जप्त केले.
काही लोक बेकायदेशीरपणे शस्त्रे विकण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. मरोळ परिसरातून दोघांना पकडून त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार देशी बनावटीचे पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे व दोन रिकामी मॅगझिन सापडली.
पोलिसांनी आरोपी प्रशांत राजोरिया आणि हर्ष कश्यप या दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त लखमी गौतम (गुन्हे), अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.