श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई अंमली पदार्थ विरोधी नियंत्रण विभागाने आग्रीपाडा परिसरातून 58,12,000 रुपयांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे.
मुंबई ANC पोलीस अधिकाऱ्यांनी आग्रीपाडा परिसरात गस्त घालत असताना संशयावरून दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 1.453 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला.
लुकमान आणि फहीम या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
सह पोलीस आयुक्त(अपराध)लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या सूचनेनुसार एएनसी वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.