महाराष्ट्रमुंबई

अटलजींचे मुंबईशी एक अनोखे नाते – ॲड आशिष शेलार

अटलजींचे मुंबईशी एक अनोखे नाते - ॲड आशिष शेलार

मुंबई अध्यक्ष भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचे मुबईशी कसे नाते होते हे विषद करताना सांगितले की, दादरच्या शिवाजी मंदिर नाटयगृहात “वाहतो ही दुर्वांची जुडी” हे मराठी नाटक पाहणारे देशाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते तसेच दादरच्या प्लाझा मध्ये बसून “हमाल दे धमाल” मराठी सिनेमाही पाहणारे ते एकमेव पंतप्रधान होते. मराठी माणसाचे आवडेते पकवान्न असलेली पुरणपोळी, मोदक सुध्दा अटलबिहारी वाजपेयी यांना आवडत असे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली त्यावेळी सुध्दा ते अन्य कुठेही न जाता मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे मुंबईवर प्रेम असणा-या अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक देशभर अन्य कुठेही होण्यापेक्षा ते मुंबईत होण्याचे एक आगळे महत्व आहे. हा संकल्प खासदार गोपाळ शेट्टी यांनी सोडला आणि तो पुर्ण केला. त्याबद्दल आमदार ॲड आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांचे अभिनंदन केले. यावेळी हा पुतळा उभारताना आघाडी सरकारच्या काळात आलेल्या अडचणी खा. गोपळा शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितल्या तर आमदार योगेश सागर, अतुल भातकळकर यांचेही भाषण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button