महाराष्ट्रमुंबई

एका कुटुंबाच्या हातात पक्षाचा निर्णय गेला की, पक्षाची, देशाची वाट लागते भाजपा नेते विनोद तावडे यांचा जोरदार टोला

एका कुटुंबाच्या हातात पक्षाचा निर्णय गेला की, पक्षाची, देशाची वाट लागते भाजपा नेते विनोद तावडे यांचा जोरदार टोला

——————————
श्रीश उपाध्याय-मुंबई
—————————-

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती. पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, देशाची वाट लागते हे आपण पाहिले, अशी बोचरी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी तर मुंबईत असली कोण आणि नकी कोण, हे लवकरच मुंबईकरांना कळेल, अशा शब्दात जोरदार हल्लाबोळ केला.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नातून पश्चिम दुतगती महामार्गानजीक कांदिवली येथे भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे त्याचे अनावरण आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार, मुंबई प्रभारी अतुल भातकळकर, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार विजय भाई गिरकर, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनिल राणे आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हा पुतळा उभारण्यासाठी आघाडी

सरकारच्या काळात परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर राज्यात युतीचे सरकार येताच पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी विनोद तावडे म्हणाले की, ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला, त्या काँग्रेस सोबत स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची शिवसेना कधीच गेली नसती. तर यावेळी बोलताना माजी राज्यपाल राम नाईक म्हणाले की, सर्वांशी मैत्री असूनही आपल्या मद्यावर ठाम कसे रहावे याचा आदर्श स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी घालून दिला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे एक नाते होते. त्यामुळे त्यांचा हा पुतळा या निवडणुकांमध्ये प्रेरणा देणाराच ठरणार आहे. आज त्यांच्या स्मृती दिनी पुतळयासमोर उभे राहून आपण सर्वांनी संकल्प करु या, मुंबईचा महापौर आता भाजपाचाच होईल. त्यानंतर मुंबईकरांना ही कळेलच की, असली कोण आणि नकली कोण, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button