बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

संपूर्ण स्वच्छता ही फक्त मोहिम नसून लोकचळवळ होत आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रदूषण कमी करण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार

मुंबई,

स्वच्छता ही प्रत्यकाच्या आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उर्त्फुतपणे सहभाग घेत आहेत. डिप क्लिन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. ही फक्त एक मोहिम नसून हे जनतेचं अभियान आहे. त्यामुळे मुंबई बरोबरच स्वच्छतेचं हे अभियान लवकरचं संपुर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

आज संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम नेपियन सी रोड, प्रियदर्शनी येथून सुरवात होवून नरिमन पॉईंट, एनसीपीए, कर्नक बंदर या ठिकाणी ही मोहिम राबवून शिवडी- न्हावा शेवा (एमटीएचएल), कोस्टल रोड या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणीकरण्यात आली. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणले की, विकसित भारत अभियान ही प्रधानमंत्री मोदी यांची संकल्पना आहे. स्वच्छ भारत अभियान हे 2015 ला सुरू करण्यात आले. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेवून हे अभियान राबविण्यास सुरूवात केली. तेव्हा खऱ्या अर्थाने या अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिप क्लिन ड्राईव्ह ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उर्त्फुतपणे प्रतिसाद देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button