जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेचा मित्रा विरुद्ध एफआयआर दाखल
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबईत कोविड दरम्यान बांधण्यात आलेल्या मुलुंड आणि दहिसर जंबो सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताडदेव पोलिस ठाण्यात आदित्य ठाकरेचा मित्रा विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, मुलुंड आणि दहिसर जम्बो कोविड सेंटर बांधण्याचे कंत्राट आदित्य ठाकरे यांचे मित्र राहुल गोम्स यांच्या कंपनी ओक्स कन्सल्टन्सीला देण्यात आले होते. आयपीसी कलम ४०६,४०९,४२०,१२०(बी) अंतर्गत ताडदेव पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW मुंबई पोलीस) या कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
सोमय्या यांनी आरोप केला की मुलुंड आणि दहिसर जंबो कोविड सेंटर बांधण्यासाठी एकूण ₹ 28 कोटी खर्च करण्यात आले होते परंतु BMC ने कंपनीला 140 कोटी रुपये दिले. घोटाळा ज्याने केला त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पथक ईडीसह कोरोनाच्या काळात झालेल्या घोटाळ्याचा तपास करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून गेल्या वर्षी हा तपास सुरू करण्यात आला होता. कोविड दरम्यान झालेल्या खर्चावर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 10 प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केले आहेत, ज्याचा तपास सुरू आहे.