महाराष्ट्रमुंबई
Mumbai: उत्तर मुंबईत आज बोरिवली विधानसभेतील उमेदवार श्री संजय उपाध्याय यांनी नामांकन अर्ज दाखल केले
मुंबई: भारतीय जनता पार्टी मुंबई सरचिटणीस श्री संजय उपाध्याय यांनी आज बोरिवली विधानसभेतून नामांकन अर्ज दाखल केले.
या प्रसंगी हजारो कार्यकर्ता सोबत एक भव्य रॅली विद्यमान बोरिवली आमदार सुनील राणे यांच्या कार्यालयातून निघाली होती.
या वेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार श्री पीयूष जी गोयल, आ.मनीषा चौधरी,आ.अतुल भातखळकर,आ.योगेश सागर, आ.प्रकाश सुर्वे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आणि गणमान्य पदाधिकारी,माजी नगरसेवक, सर्व युवा महिला आघाडी तसेच संघटनेतील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
आज संध्याकाळी धनत्रयोदशी उत्सव साजरा करत संजय उपाध्याय कार्यकर्त्यांशी संवाद करणार.
बोरिवली विशाल कार्यकर्ता संमेलन आजच बोरिवली पश्चिम येथील मधुरम हॉल शिंपोली येथे आयोजित करण्यात आले आहे.