Mumbai: नालासोपारा आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये ” भगवान श्री धन्वंतरी महायज्ञ संपन्न”
नालासोपारा: 29 ऑक्टोबर 2024 रोजी धन्वंतरी जयंती दिवशी महाविद्यालयामध्ये “नवव्या आयुर्वेद दिना” निमित्त सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याच्या माध्यमातून विश्वकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन जन आरोग्य व जन भागीदारी द्वारा आरोग्य देवता “भगवान श्री धन्वंतरी महायज्ञ” चे आयोजन सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत करण्यात आले होते, यामध्ये महाविद्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय आणि नालासोपारा, वसई, विरार परिसरातील जनतेने या यज्ञात सहभाग घेतला व समिधा साकल्याची आहुती देऊन सुंठ, धणे, गूळ, सुका मेवा इ. औषधी असलेला प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.जयप्रकाश दुबे, सचिव डॉ.ओमप्रकाश दुबे, विश्वस्त डॉ.ऋजुता दुबे, अमित दुबे, विशाल दुबे, डॉ. अनुज दुबे व प्राचार्या डॉ.हेमलता शेंडे यांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून अश्वगंधा, बिल्वपत्र , आवळा, गुडूची, गुग्गुळ, ज्येष्ठमध, तुलसी तुळशी बीज, शतावरी, अतसी, लवंग, गोमय, अबीर, कमळ, काळे तीळ,अशोक, तगर, मंजिष्ठा, गुलाब केसर, शिवलिंगी बीज, ओवा, हीना के मेहंदीचे बीज, जटामांसी आदि समिधा साकल्य यज्ञात अर्पण करून महाप्रसादाचा लाभ घेतला. याशिवाय नालासोपारा, वसई, विरार भागातील अनेक मान्यवर या यज्ञात सहभागी झाले होते, 132 विधानसभा नालासोपारा ,भाजपा उमेदवार राजन नाईक यांनी धन्वंतरी यज्ञामध्ये उपस्थित राहून समिधा साकल्याची आहुती देऊन आरोग्याची देवता धन्वंतरीचा आशीर्वाद घेतला व नालासोपाराच्या जनसामान्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
अत्यंत उत्साही वातावरणात हा महायज्ञ संपन्न झाला.
धन्वंतरी यज्ञ सुरू होण्यापूर्वी स्मार्ट प्रकाशन द्वारा प्रकाशित सहा पुस्तिकेंचे विमोचन संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दुबे आणि महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ.ओमप्रकाश दुबे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सर्व पुस्तकांचा विमर्श समजावून समाजात समरसता निर्माण करण्यासाठी वसई जनता सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी कुंदन खांडेकर यांनी कथन केला.