मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी पक्षाप्रती असलेल्या प्रतिक्षा आणि प्रामाणिकपणाचे फळ त्यांना मिळाले आहे. बोरिवली विधानसभेतून भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
संजय उपाध्याय हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही राहिले आहेत. संजय उपाध्याय गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रिय आहेत.
संजय उपाध्याय यांना विलेपार्ले विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने मुंबईतील संपूर्ण उत्तर भारतीय समाजात नुकतेच संताप आणि दु:खाचे वातावरण होते. ती नाराजी दूर करत भाजपने अखेर संजय उपाध्याय यांना बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.