मौलवी मोहम्मद अस्लम हाफिजला POCSO अंतर्गत अटक
पवई पोलिसांनी मोहम्मद अस्लम हाफिज या मौलवीला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करून पुढील कारवाईसाठी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
श्रीश उपाध्याय/मुंबई: पवई पोलिसांनी मोहम्मद अस्लम हाफिज या मौलवीला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करून पुढील कारवाईसाठी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पवई पोलिसांना माहिती मिळाली की 12वीत शिकणाऱ्या एका मुलीने समुपदेशनादरम्यान सांगितले की, सुमारे 10 वर्षांपूर्वी मौलवी मोहम्मद अस्लम हाफिजने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. समुपदेशनादरम्यान मुलीने सांगितले की 10 वर्षांपूर्वी एक मौलवी मोहम्मद अस्लम हाफिज तिला अरबी भाषा शिकवण्यासाठी तिच्या घरी यायचा. अरबी शिकवताना मौलवी तिला अयोग्यरित्या स्पर्श करायचे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मौलवी मोहम्मद अस्लम हाफिजविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या मौलवीला अटक करून पुढील कारवाईसाठी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-10) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांचे पथकाने केली आहे.