Mumbai: माजी आमदार संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, बेलापूरमधून आपला आमदार विजयी होणारच, मला पूर्ण खात्री
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
नवी मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी हातात तुतारी घेत पक्षप्रवेश केला आहे.
आजही शहरी भागात अनेक प्रश्न समोर आले आहेत. तुम्ही मनात आणलं तर बेलापूरचा आमदार हा तुतारीचा असेल असं म्हणत तुमची मला ताकद माहिती आहे अशा शब्दांत जयंत पाटील यांनी संदीप नाईक यांचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षात स्वागत केलं. ते नवी मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. तसंच, जेव्हा जेव्हा नवी मुंबईत येत होतो तेव्हा मला काहीतरी हरवलं आहे असं वाटत होतं. परंतु, आता हरवलेलं सापडलं आहे असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
जयंत पाटील म्हणाले की, या शहरात अनेक प्रश्न आहेत. १२.५% भूखंडाचे काम अर्धवट राहिले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन कार्य प्रलंबित आहे. इमारतीचे मालकी हक्क सिडकोकडे आहेत, ते मिळवायचे आहेत. मोरबे धरण्याचे पाणी पळवले आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. असे जयंत पाटील म्हणाले.
संदिप नाईक आज जरी इकडं आले असले तरी भाजप किंवा विरोधात असलेले अनेक कार्यकर्ते आणि नेते आमच्या संपर्कात आहेत. चंद्र कलेकलेने वाढतो. आमची तुतारी त्यापेक्षा जोरात वाढतीये असं म्हणत आमची परिस्थिती सर्वात चांगली आहे. तसंच, आमच्याकडं कुणीच नव्हतं तेव्हा आमच्याकडे आठ खासदार आहेत. असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आज अनेक शहरी प्रश्न समोर आलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बेलापूर येथे तुतारीचा विजय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळे मुद्दे लक्षात घेऊन यावेळी मतदान करायचं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा आपला पक्ष आहे. मी संदीप नाईक यांना शब्द देतो तुम्हाला कुणीही वेगळी वागणूक देणार नाही. त्यामुळे तशी काळजी करू नका. सध्या महाराष्ट्र प्रगतीवरून घसरला आहे. तो पुन्हा एक नंबरवर आणायचा असेल तर आपण सोबत राहून काम करू. बाकी, न्याय देण्याचं काम जेव्हा करायचा असोत तेव्हा फक्त शरद पवार साहेबच करू शकतात असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी भरत नखाते – माजी उपमहापौर , संपत शेवाळे – माजी स्थायी समिती सभापती ,शुभांगीताई पाटील – माजी स्थायी समिती सभापती, श्याम महाडीक – माजी स्थायी समिती सभापती, वैभव नाईक, डॉ. जयाजी नाथ-माः नगरसेवक ,सुरज पाटील- माजी नगरसेवक ,अशोक गुरखे – माजी नगरसेवक ,अमित मेढकर- माजी नगरसेवक, गणेश भगत ,प्रकाश मोरे – माजी नगरसेवक,राजेश शिंदे – माजी नगरसेवक, विशाल डोळस – माजी नगरसेवक , शशीकलाताई पाटील- माजी नगरसेविका,निशांत भगत, फशीबाई भगत- माजी नगरसेविका,रुपालीताई भगत- माजी नगरसेविका , वैजयंतीताई ‘भगत- माजी नगरसेविका, सुजाताताई पाटील-माजी नगरसेविका, माधुरीताई सुतार – माजी नगरसेविका ,जयवंत सुतार- माजी महापौर ,रविंद्र इथापे – माजी सभागृह ,दशरथ भगत – माजी विरोधी पक्ष ,नेत्राताई शिर्के – माजी स्थायी समिती सभापती,अंजलीताई वालुंज-नगरसेविका, सुनंदाताई पाटील – माजी नगरसेविक , रोहणीताई शिंदे – माजी नगरसेविका, भगवान ढाकी- माजी जिल्हाध्यक्ष ,सुरेश शेट्टी- माजी नगरसेवक ,जयश्रीताई ठाकर- माजी नगरसेविका, शिल्पाताई कांबळी – माजी नगरसेविका ,मीराताई पाटील – माजी नगरसेविका, अब्दा गवस- माजी नगरसेविका , प्रदीप गवस – माजी सभापती , गिरीष म्हात्रे – माजी नगरसेवक, रेखाताई म्हात्र – माजी नगरसेविका ,विनोद म्हात्रे – माजी नगरसेवक ,गणेश म्हात्रे – माजी नगरसेवक ,सुरेखाताई मरबारी- माजी नगरसेविका , सुनील पाटील – माजी नगरसेवक , विवेक पाटील – माजी नगरसेवक , राजेभीताई कातकरी माजी नगरसेविका , स्नेहाताई पालकर – माजी नगरसेविका , शैलाताई नाथ – माजी नगरसेविका , सुरेखाताई इथापे – माजी नगरसेविका,शेख – माजी सभापती, पूजाताई मेढकर माजी नगरसेविका , भरत माइक, विजय वाळुंज ,विजय घाटे, निवृत्ती कापडणे- माजी नगरसेवक ,सुनील घरत खश्रीम, स्वातीताई लोहोटा इत्यादींचा पक्षप्रवेश झाला आहे.