राजश्री शाहू कॉलेज ऑफ लॉ यांनी आयोजित केले कायदे विषयक सल्ला शिबीर
विक्रोळी 19 : भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम (भारताचे मिसाईल मॅन) यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त अभय शिक्षण केंद्राचे राजश्री शाहू कॉलेज ऑफ लॉ द्वारा मोफत कायदे विषयक सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
विक्रोळी 19 : भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम (भारताचे मिसाईल मॅन) यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त अभय शिक्षण केंद्राचे राजश्री शाहू कॉलेज ऑफ लॉ द्वारा मोफत कायदे विषयक सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
समाजातील गरीब, शोषित, व वंचित लोकांना कायद्याबाबत उचित सल्ला देत मोफत न्याय मिळावा ही संकल्पना घेवून आजचे शिबीर आयोजित केले असल्याचे कॉलेजचे प्राचार्य (प्रिन्सिपल) डॉ संजय सिंह यांनी सांगितले.
विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग तसेच शेजारील झोपडपट्टी विभागातील सर्वसामान्य गरीब लोकांनी याठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या कायदेशीर समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला तसेच उचित मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
सदर प्रसंगी विक्रोळी न्यायालयाचे न्यायाधीश तसेच अभय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी तसेच कॉलेजचे प्राध्यापक वर्ग रिचा चौरसिया मॅडम, मंगेश जवळेकर, हेमंत मोरे, सचिन काटे, कैलास सर, आदी सर्व उपस्थित होते.