Mumbai: काँग्रेस पळपुटी, ट्विट डिलीट करत मुंबई काँग्रेसचा पळ
मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांच्या टिकेनंतर ट्विट डिलीट करण्याची मुंबई काँगेसवर नामुष्की
मुंबई: एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपाबाबतचे ट्विट मुंबई काँग्रेसने केले होते. त्यावर मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी ‘भारत तोडणे हेच काँग्रसचे धोरण’ असल्याची घणाघाती टीका केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने पळ काढत ट्विट डिलीट केले आहे.
फोडा आणि राज्य करा, ही नीती राबविणाऱ्या काँग्रेसचे भारत तोडणे हेच धोरण आहे.अमेरिकेच्या न्याय विभागाने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केला आहे. याला काँग्रेसचे मिळणारे समर्थन देशासाठी घातक आहे.देशाच्या विभाजनाला जबाबदार असलेला काँगेस आणि त्यांचे नेते देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब करत आहेत. भारत जोडो यात्रा काढणारेच भारत तोडोच्या मार्गावर चालले आहेत. देशासाठी लढणाऱ्या शुरविरांवर शंका घेवुन त्यांना बदनाम करण्याचे काम काँग्रेसी करत आहेत. देशविरोधी काँग्रेसला महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल असा टोलाही मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी लगावला आहे.