Mumbai: आज इस्लामपूर येथे शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, खा. धैर्यशील मोहिते पाटील असे दिग्गज नेते राहणार उपस्थित
निवडणुका जाहीर झाल्यानंतर शरद पवार साहेब, जयंत पाटील यांची पहिली जाहीर सभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, जयंत पाटील कार्यकर्त्यांना काय आदेश देणार?
सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, खा. धैर्यशील मोहिते पाटील असे दिग्गज नेते या सांगता सभेला राहणार उपस्थित आहे.
ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली होती. प्रदेशाध्यक्ष नेतृत्वात जयंत पाटील आणि खा. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत आपल्या भाषणांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि खा. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले. राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला. ९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत २४ दिवस पूर्ण झाले आहेत. शिवस्वराज्य यात्रेने या २४ दिवसात १९ जिल्हे पूर्ण केले आहेत आणि तब्बल ७३६५ किलोमीटरचा प्रवास गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघांमध्ये केले आहे.
दरम्यान कालच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार साहेब आणि जयंत पाटील यांची ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेची ही सांगता सभा असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच या सभेत फोडला जाईल असे समजू शकतो. आता या सभेत शरद पवार साहेब आणि जयंत पाटील हे दोन्ही प्रमुख नेते कार्यकर्त्यांना काय आदेश सोडणार यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.