मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई
47 लाखांच्या अमली पदार्थांसह 3 जणांना अटक
श्रीश उपाध्याय/मुंबई
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलने तीन वेगवेगळ्या गुन्ह्याखाली कार्रवाई करत 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 47 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटने 10 ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी परिसरात गस्त घालत असताना विदेशी नागरिक रिचर्ड कोमे याला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून 44,40,300 रुपये किमतीचे 111 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर युनिटने गोवंडी परिसरातून अरबाज उर्फ जब्बार याला कोडीन मिश्रित कफ सिरपच्या 88 बाटल्यांसह अटक केली आहे.
अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने आरोपी इम्रानला वांद्रे परिसरातून कोडीन मिसळलेल्या कफ सिरपच्या ४७७ बाटल्यांसह अटक केली आहे.
पोलीस सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंबई पोलीस उपायुक्त(एंटी नार्कोटिक्स सेल)शाम घुगे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे,कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ , घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान बेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.