अंधेरी, जेबी नगरच्या जैन मंदिराला कुलूप !
पोलिसांच्या देखरेखीखाली ३ दिवसांनी मंदिर सुरू झाले
अंधेरी, जेबी नगरच्या जैन मंदिराला कुलूप !
पोलिसांच्या देखरेखीखाली ३ दिवसांनी मंदिर सुरू झाले.
श्रीश उपाध्याय/मुंबई
अंधेरी, जेबी नगर येथील जैन मंदिर तीन दिवसांपासून बंद होते, विश्वस्तांमधील वादामुळे मंदिर, पोलिस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मदतीने पुन्हा उघडण्यात आले आहे.
भाजप नेते वकील संदीप शुक्ला यांनी माहिती दिली कि प्रत्यक्षात जैन मंदिरातील विश्वस्तांच्या निवडणुकीत जुन्या विश्वस्तांचा पराभव झाला होता. त्यानी मंदिरासाठी जमीन देणाऱ्या दात्याला पुढे करून मंदिराचा ताबा घेतला आणि मंदिराला कुलूप लावले. या प्रकरणाची तक्रार मिळताच भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय, मंत्री मंगल प्रभात लोढा, जैन समाजाचे साधू आणि स्थानिक जैन समाजाने मंदिर पुन्हा उघडले. कोणत्याही वादाला खतपाणी मिळू नये, हे लक्षात घेऊन पोलिसांनी मंदिराला सुरक्षा पुरवली आहे.
जैन मंदिराचे सहसचिव जितूभाई जैन म्हणाले की, मंदिर सार्वजनिक आहे. एकदा दान केल्यावर जमीन मालकाचा जमिनीवर कोणताही अधिकार नसतो. तरीही देणगीदाराने मंदिराचा ताबा घेतला होता. मात्र, आता मंदिर पुन्हा खुले करण्यात आले आहे.