Mumbai: कृपया प्रसिद्धीसाठी, आदित्य ठाकरे तोंडावर आपटले- मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांची टीका
मुंबई मेट्रो ३ मधून प्रवास करण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रवाशांची अफाट गर्दी दिसून आली. स्थानकावर तिकिटांसाठी लांब रांगा लागल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मेट्रो मॅन असून आदित्य ठाकरे तोंडावर आपटले असल्याची टीका मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी एक्स वरून केली आहे.
मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो सर्वसामान्यांसाठी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर ही मेट्रो सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोला पहिल्या दिवशी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. मेट्रोला महाविकास आघाडीने रोखले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख आता मेट्रो मॅन असा होतो आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विरोधकांचे तोंड आपोआप बंद झाले असल्याची टीका मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी केली आहे.