Mumbai: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभाराविरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन
मुंबई: पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीला समस्याने ग्रासलेल्या मात्र या समस्यांकडे स्थानिक प्रशासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या विरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते,पाणी,वीज व कचऱ्याची मोठी समस्या आहे. अतिक्रमणे वाढण्यासोबत आग लागण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. पिंपरी चिंचवड,चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती भिगवन, इंदापूर,जेजुरी ,कुरकुंभ, खेड या औद्योगिक वसाहतीस हिंजवडी आयटी पार्क आणि खराडी नॉलेज पार्क आहे. यात औद्योगिक उत्पादनापासून माहिती तंत्रज्ञानाचा उद्योगांचा समावेश आहे.
यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. प्रत्यक्षात या औद्योगिक वसाहती पाहिल्यास तिथे रस्त्यापासून पायाभूत सुविधा पर्यंत सगळ्यांचाच वनवा आहे. त्याकडे स्थानिक प्रशासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कडून दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे सोलर पॅनल, वेदांत, फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान, सफ्रन, बलक ड्रग प्रकल्प इतर राज्यात जात असताना मुंबईमधील मोठी झेप्टो कंपनी बंगलोरमध्ये गेली.
महायुती सरकारच्या उदासीन कारभाराने चाकण औद्योगिक वसाहतीमधील 50 कंपन्या इतर राज्यात गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश यासारख्या राज्यामध्ये स्थलांतर झाले. बेरोजगारीच्या नावाखाली खोटी आश्वासने देऊन युवकांची फसवणूक महायुती सरकारने केलेली आहे रोजगारापासून तरुणाईला वंचित ठेवणाऱ्या या महायुती सरकारला राज्यातील युवा माफ करणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी संताप व्यक्त केला.
लघु व मध्यम उद्योगांचा विचार करता सर्वात जास्त नोंदणीकृत उद्योग पुण्यात आहेत. पुण्यातील उद्योगांच्या पुरवठा साखळीत हे लघु व मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे तसेच त्यांच्याकडून होणारी निर्यातही मोठी आहे. असे असताना उद्योगांच्या वाढीसाठी ठोस पावले उचलली जातना दिसत नाही अशी खंत उद्योजक व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग प्रकल्प हे इतर राज्यात वळवून महाराष्ट्रातील युवकांवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला राज्यातील युवा वर्ग माफ नाही करणार बेरोजगार युवा त्यांचा हक्क मागणारच.देशातील प्रमुख औद्योगिक उत्पादन केंद्र माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र असा नावलौकिक असलेल्या पुण्यात उद्योगांना पूरक अशा अनेक पायाभूत सुविधा अद्याप उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत उद्योग दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असलेल्या या जिल्ह्यात अद्याप आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहू शकले नाही अशी अवस्था आहे. असेही ॲड.अमोल मातेले यांनी बोलताना म्हटले आहे.
महायुती सरकारने आता घोषणाच्या पलीकडे जाऊन उद्योगांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावे.अशी उद्योग क्षेत्राची मागणी आहे. पुणे जिल्ह्याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे असून प्रत्येक जिल्ह्यासाठी पुणे जवळचे मोठे केंद्र ठरले. त्यामुळे पुण्यात होणारी गुंतवणूक ही मोठी आहे. रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात होणारे स्थलांतरित अधिक आहे. असेही ॲड.अमोल मातेले म्हणाले.
यावेळी मुंबई उपाध्यक्ष कैलास कुशेर,सरचिटणीस अमोल हिरे, इम्रान तडवी,फराज सिद्दिकी, इम्रान तडवी,हनीफ पटेल, प्रतीक नांदगावकर, रमिझ राजा ,राकेश सोडे, जिल्हाध्यक्ष मयूर केणी, इम्रान शेख ,संतोष पवार तालुकाध्यक्ष कमलेश दांडगे, सुयोग भुजबळ, सुदर्शन खंडागळे, इक्रार चौधरी, विजय येवले, सेलवेन डिसोजा, मुजीब अन्सारी, इमरान शेख, प्रमोद गुप्ता, व नवनाथ सकपाळ इतर पदाधिकारी उपस्थित होते