Mumbai: भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने “विजय संकल्प महारॅलीत” शंखनाद
मुंबई: केंद्रीय मंत्री मा.श्री अमित भाई शाह जी यांच्या सूचनेनुसार व भाजपा मुंबई अध्यक्ष श्री आशिष शेलार जी यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने मुंबईतील सर्व ३६ विधानसभांमध्ये “विजय संकल्प महारॅली” बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री तेजिंदर सिंग तिवाना जी यांनी मालाड पश्चिम विधानसभेत आयोजित केलेल्या “विजय संकल्प महारॅली” ला केंद्रीय मंत्री माननीय श्री पीयूष गोयल जी यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. युवकांनी उत्साह आणि उर्जेने भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण मालाड दुमदुमून टाकले.
मालाड विधानसभेच्या बूथ स्तरापर्यंतच्या मुख्य भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. तसेच रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे आभार मानणारे फलक हातात घेतले होते. ही बाईक रॅली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक विधानसभेतील बूथ स्थरापर्यंत सुरू करण्यात येणार आहे