Mumbai: राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी पाच वाढीव केंद्रांना मान्यता
मुंबई: महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी वाढीव पाच केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील अस्तित्वातील १९ केंद्रांव्यक्तीरिक्त पाच केंद्रांची संख्या वाढवून एकूण २४ केंद्रे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात हौशी कलावंत संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह हौशी कलावंत संघटनेच्या पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत वाढीव केंद्रांना मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झालेली असून पाच वाढीव केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.