Mumbai: हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे, ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सचिव डॉ. केयूर प्रमाणिक यांच्या वतीने 10 सप्टेंबर 2024 ला गोरेगाव पोलीस वरिष्ठ निरिक्षक यांना दिलेला अर्ज ज्यात ,श्री स्वामी समर्थ यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात आज भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वक्तव्य संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात करण्यात आले होते, ज्यामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. श्री स्वामी समर्थ यांचा अपमान करून महाराव यांनी हिंदू समाजाला अपमानित केली आहे, अशी तक्रार भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात डॉ. केयूर प्रमाणिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता व त्याच संधर्भात ज्ञानेश विरुद्व गुन्हा दाखल केला गेला आहे .
या घटनेने हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून, योग्य कारवाईची मागणी करण्यात येत आहे.