महाराष्ट्रमुंबई

Mumbai: मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची कारवाई, ५१ लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलने दोन वेगवेगळ्या कारवाईत ५१ लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह दोन आरोपींना अटक केली आहे.

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरात गस्त घालत असताना संशयाच्या आधारे 22 किलो गाजासह एका आरोपीला अटक केली.
ANC च्या वरळी युनिटने माहीम परिसरात गस्तीदरम्यान 214 ग्रॅम एमडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक केली आहे.
या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू असून, दोन्ही आरोपींची नावे समोर आलेली नाहीत.

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त शाम घुगे यांच्या सूचनेनुसार वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button