Mumbai: ॲड राहुल नार्वेकर यांनी मोईन मियाँचे कौतुक केले
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवाच्या आगमनाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची कोंडी वाढली होती. अशा परिस्थितीत ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत सय्यद पीर मोईन मियाँ साहेब यांनी 18 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या उपक्रमामुळे दोन्ही सण शांततेत पार पडले तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांनी बिलाल मस्जिद गाठून मोईन मियाँ यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस आहे. गणेशोत्सवही त्याच दिवशी होता. अशा परिस्थितीत संघर्ष टाळून दोन्ही सण साजरे केले. गेल्या 2 वर्षांपासून सामंजस्याची भूमिका घेत आहे. ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत सय्यद पीर मोईन मियाँ साहेब यांच्या या भूमिकेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी, आमदार अमीन पटेल, इस्लाम जिमखाना अध्यक्ष युसूफ अब्राहानी, एड रिझवान मर्चंट, इब्राहिम खान, अस्लम लाखा, अक्रम खान, बाबू बत्तेली, अबू स्वालेह आदी उपस्थित होते.