महाराष्ट्रमुंबई

Mumbai: गुन्हे शाखा 3 ने जुगारच्या अड्ड्यावर छापा टाकून 34 जणांना केली अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

मुंबई क्राईम ब्रँच 3 ने भायखळा परिसरात जुगारच्या अड्ड्यावर छापा टाकून 34 जणांना अटक केली आहे.
भायखळा येथील स्टील इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या गोदामात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 3 ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी पहाटे छापा टाकला. या छाप्यात जुगार अड्ड्याच्या मालकांसह एकूण 34 जणांना अटक करण्यात आली आहे. छाप्यात 14,61,400 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार, गुन्हे शाखा 3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने वरील कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button