Mumbai: मानराज प्रतिष्ठानचे 368 वे मोफत वैद्यकीय शिबीर सेवा अविरत सुरूच
मानराज प्रतिष्ठानने 15 सप्टेंबर 2024 रोजी सेवा नगर सार्वजनिक गणेश मंदिर, प्रभात कॉलनी, मुंबई 55 यांच्या सहकार्याने आपले 368 वे मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 171 रुग्णांनी सहभाग घेतला, त्यापैकी 42 ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले.
शिबिरात ६० रुग्णांच्या मोफत रक्त तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये थायरॉईड, रँडम शुगर आणि कोलेस्टेरॉलची तपासणी करण्यात आली. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे आणि त्यांना उत्तम आरोग्य सेवा देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.संस्कृती कळमकर, अनिल आगलदिवते, विद्या यादव, हरकेश पांडे, विनोद बावळे, संजय पारकर, संजय देवरुखर, संजय खीर, रवी त्रिलोटकर, विशाल नाईक, धवल गरसिया यांनी मोलाचे योगदान दिले.
मानराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी म्हणाले की, “समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, आणि आम्ही हे कार्य अखंड चालू ठेवू. आपल्या समाजाला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी हे शिबीर एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
स्थानिक रहिवाशांनी या शिबिराचे कौतुक करून मानराज प्रतिष्ठानच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करणे हीच खरी सेवा आहे हे या सेवा कार्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.