Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यास जात असताना नसीम खान पोलीसामार्फत स्थानबद्ध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करण्यास जात असताना CWC सदस्य व महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यंची पोलिस ताफ्यानी अडवणूक करीत घरी स्थानबद्ध (House Arrest) करण्यात आले.
यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना नसीम खान म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा म्हणजे फक्त पुतळा नव्हता अख्ख्या राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता होती. जी कि तुम्ही सत्तेसाठी नीलाम केली. आम्ही राज्याच्या अस्मितेचा आवाज उठवायचा नाही का ? आमची लढाई आणि मागण्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आहेत. तरीसुद्धा नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड होत आहे यावरून हे सिद्ध होत आहे की, हे हुकुमशाही प्रवृत्तीचे सरकार असून त्यांना देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. या प्रकरणात जेवढे राज्याचे मुख्यमंत्री गुन्हेगार आहेत त्यापेक्षा जास्त मोठे भागीदार हे केंद्राचे मोदी सरकार आहे.
त्यांनी याबद्दल माफी मागितलीच पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करीतच राहणार आणि सरकारला प्रश्न विचारत राहणार. नसीम खान पुढे म्हणाले की, हे सरकार लोकशाही पद्धतीने नव्हे तर ठोकशाही पद्धतीने सरकार चालवीत असतील तर येणाऱ्या काळात राज्यातील जनता त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही.
नसीम खान यांना घरी स्थानबद्ध केल्याची बातमी मिळताच कॉँग्रेसचे प्रभाकर जावकर, शरीफ खान, सुमित बारस्कर, सुहास राणे, भाऊ शेट्टी, रवी हिंगमिरे, नितीन पवार, अशोक पोळ, वजीर मुल्ला, पांडुरंग दरवेश, रुक्मिणी शिंदे, छाया खराटे, कलावती गिरमाजी, रियाज मुल्ला तर शिवसेना (उबाठा) गटाचे साईनाथ कटके, बालाजी सांगळे, प्रशांत मोरे, चंदन सावंत, सन्नी आचरेकर, यांच्यासह हजारोंच्या संख्येने अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होऊन सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.