Uncategorizedक्राईमबातम्यामहाराष्ट्रमुंबई

शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उद्या घटनास्थळी जाणार

शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उद्या घटनास्थळी जाणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे घाईगडबडीत केलेले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचणारे ठरले. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला.

या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन याविरोधी आंदोलनाचा पुकारा दिला आहे. उद्या, दि. २८ ऑगस्ट २०२४, सकाळी ११.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ हे आंदोलन करण्यात येईल.

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button