महाराष्ट्रमुंबई
Mumbai: महिलांच्या सुरक्षा प्रती महायुती सरकार संवेदनशील नाही …. नसीम खान यांचा आरोप
आज काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर व कोलकत्ता मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ चांदिवली विधानसभेत मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, महिला संघटनांचे प्रतिनिधि तसेच हजारोच्या संख्येने काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकाराशी बोलताना नसीम खान म्हणाले की, राज्याचे महायुती सरकार महिलांच्या सुरक्षेबद्दल अजिबात संवेदनशील नाही.
पोलीस प्रशासन व सरकार अशा घटना गंभीरपणे घेत नसल्यामुळे ठाणे, मुंबई सहित संपूर्ण राज्यात महिला व लहान-लहान मुलीवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस घडत असून त्यातून अशा घटना वाढत आहेत. नसीम खान यांनी राज्याचे सरकार व पोलिस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, असे कृत करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी आणि महाराष्ट्रातील महिला व मुलीना सुरक्षा द्यावी हीच त्याच्याकरिता त्यांच्या लाडक्या भावाकडून सप्रेम भेट असेल.
या मूक निषेध मोर्चात मुंबई प्रदेश उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, रामगोविंद यादव, जिल्हाध्यक्ष रॉय मनी, अखिल भारतीय युवक कॉँग्रेस सचिव सुरभी दिवेदी, समीर अख्तर, शरद पवार, वजीर मुल्ला, भाऊ शेट्टी, चांदिवली महिला तालुका अध्यक्ष राधिका पवार, माजी नगरसेविका सविता पवार, शकिला अंसारी, राष्ट्रवादी मुंबई महासचिव बाबू बत्तेली, यांच्यासह चांदिवली तालुक्यातील सर्व महिला कार्यकर्ते पुरुष ब्लॉक अध्यक्ष सहित हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व स्थानिक लोक उपस्थित होते.