Mumbai: शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक समाजाने इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान दिले आहे अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक समस्या आहे. या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत २८ ऑगस्ट रोजी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक समस्या आहे. या समस्या शरद पवार साहेब यांच्यासमोर मांडण्याकरिता अल्पसंख्यांक समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग सिराज मेंहदी यांच्यासह प्रमुख नेते आणि राज्याचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. असे नसीम सिद्दिकी म्हणाले.
नसीम सिद्दिकी म्हणाले की, या बैठकीमध्ये प्रमुख तीन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये
वक्फ बोर्ड संदर्भात मोदी सरकारने संसदेत विधेयक मांडले आहे. मोदी सरकारला वक्फ बोर्डात कुठलीही सुधारणा करायची नाही आहे. वक्फ बोर्डाची साडेतीन लाख एकर जमीन संपूर्ण देशात आहे. ही जमीन बिल्डरांना देण्याचा डाव मोदी सरकारचा आहे. असेही नसीम सिद्दिकी म्हणाले.
नसीम सिद्दिकी म्हणाले की, मुस्लिम समाजातील दुर्लक्षित घटकांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. नंतर फडणवीस सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाचा आरक्षण रद्द करण्यात आले. यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक समाजाला दहा टक्के जागा देण्यात यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे असे नसीम सिद्दिकी यांनी सांगितले.