Uncategorized
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असून गोव्यातून नऊ लाख रुपयांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश
श्रीश उपाध्याय/मुंबई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असून गोव्यातून नऊ लाख रुपयांच्या चरससह दोन आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
हिमाचल प्रदेशातून गोव्यात चरस आणून त्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने थिविम रेल्वे स्थानकातून केटीला 9 किलो चरससह अटक केली. केटीच्या चौकशीच्या आधारे एनसीबीने उत्तर गोव्यातून आयबीला अटक केली आहे. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतर ड्रग्ज विक्रेत्यांनाही अटक होऊ शकते.