महाराष्ट्रमुंबई

Mumbai: निवडणुकीआधी महायुती फुटणार…..महेश तपासे यांचा दावा

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भारतीय जनता पार्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं असा भाजपवर थेट हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रथम शिवसेना फोडली व त्यानंतर शरद पवार साहेबांची ताकद कमी करण्यासाठी राष्ट्रवादी फोडली तरी देखील महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान महायुती सरकारला त्यांची जागा दाखवली याची आठवण तपासे यांनी करून दिली.

काल जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भारतीय जनता पार्टीने काळे झेंडे दाखवले तसेच भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी आहेत असा आरोप एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. या दोन्ही गोष्टी महायुतीमध्ये झालेल्या महा बिघाडीचे संकेत असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अजिबात समन्वय नाही, एकमेकांच्या बद्दल आदर नाही, महाराष्ट्राचा सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी काम करण्याची वृत्ती नाही फक्त सत्तेचा मलिदा चाटणे व स्वतःवर झालेल्या केसीज बंद करून घेणे एवढ्याच उद्दिष्टासाठी महायुती स्थापन झाली असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

  1. शिंदे सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रय लाटण्याचा प्रयत्न परस्पर अजित पवार करत असल्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. सरकारी खर्चातून होणाऱ्या या योजनेला विरोधी पक्षातील नेत्यांना खासदारांना, आमदारांना का बोलवलं जात नाही असा सवाल ही महेश तपासे यांनी उपस्थित करत विद्यमान सरकारला अडचणीत आणले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button