म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणुकीचा पर्दाफाश , दोन अटक
काही लोक म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून म्हाडाच्या घरांसाठी आकारलेली रक्कम घेत असल्याची तक्रार मुंबई गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती.
म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणुकीचा पर्दाफाश, दोन अटक
श्रीश उपाध्याय/मुंबई
म्हाडाची बनावट वेबसाइट तयार करून लोकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा आणि सायबर सेल विभागाने अटक केली आहे.
काही लोक म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून म्हाडाच्या घरांसाठी आकारलेली रक्कम घेत असल्याची तक्रार मुंबई गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त (सायबर सेल, मुंबई) दत्ता नलावडे यांच्या सूचनेनुसार
सायबर सेलचे (वांद्रे) पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित, गुन्हे शाखा युनिट 5 चे सहायक पोलीस निरीक्षक माळी, गुन्हे शाखा 4 चे उपनिरीक्षक भिसे, गुन्हे शाखा युनिट 3 चे हवालदार अनभुले, बिडवे यांनी मिळून ही कारवाई केलीकल्पेश सेवक, अमोल पटेल या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.